राष्ट्रीय विचार, शास्त्रीय विचार
- अख्ख्या जगाला माहित आहे भारताचा नववर्ष दिन १ चैत्र (म्हणजेच २२ मार्च) . या दिवशी सर्व जगात कुठेही १२ तासाचा दिवस व १२ तासाची रात्र असते.
- १ चैत्र या दिवशी भारत देशात, आशिया खंडात, उत्तर गोलार्धात वसंत ऋतु सुरू होतो सर्व सृष्टी नव्या मोहोराने टवटवीत होते.
- भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर मध्ये, एका वर्षात ३६५ दिवस म्हणजेच १२ महिने आहेत. (रोज रात्री १२ वाजता दिवस बदलतो) चैत्र - ३० दिवसाचा, वैशाख, ज्येष्ठ,आषाढ, श्रावण, भाद्रपद हे पाच महिने ३१ दिवसांचे, आश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ, फाल्गुन प्रत्येकी ३० दिवसांचे.
- भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर निसर्गाला अनुसरून आहे, उन्हाळा १८५ दिवस, हिवाळा १८० दिवस. चैत्र - ३० दिवसाचा वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण भाद्रपद हे पाच महिने ३१ दिवसाचे. आश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ, फाल्गुन प्रत्येकी ३० दिवसाचे.
- १९५७ साली भारताने तीन गोष्टी केल्या
- नवे चलन आणले - १ रुपया १०० पैसे केले त्याआधी पै, पैसे, आणे होते. विक्टोरियाची मोहर त्या ऐवजी तीन सिंहाचे चित्र टाकले.
- दशमान पद्धतीची वजनमापे आणली. मीटर, लीटर, किलो, हेक्टर हे मापे आणली शेर, औंस, पौंड, मण, बार, फुट, एकर मापे रद्द केली.
- नवे कॅलेंडर आणले- २२ मार्च म्हणजेच १ चैत्रला सुरू होणारे जानेवारी ते डिसेंबर महिने असणारे ग्रेगोरियन - कॅलेंडर ऐवजी भारतीय सौर कॅलेंडर आणले.
- भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर कोणी रचले? डॉ. मेघनाद साहा समितीने रचले आहे. डॉ. साहा यांच्यासह इतर तज्ज्ञ होते.
- प्रा. अ. च. बॅनर्जी
- प्रा. र. वि. वैद्य
- पं. के. ल. दप्तरी
- डॉ. अकबर अली
- श्री. ज. स. करंदीकर
- श्री. निर्मलचंद्र लाहिरी
- पं. गोरख प्रसाद
- आपण आपल्या देशाचे कॅलेंडर कुठे वापरू या!
- आपल्या चेकवर भारतीय सौर दिनांक लिहा.
- २२ मार्च म्हणजेच १ चैत्र या दिवशी सर्वांना नववर्षाभिनंदन करा.
- राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री इ. सर्व लोकप्रतिनिधींनी आकाशवाणी, दूरदर्शनवरुन भारतीय जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा द्याव्यात, असा आग्रह करणारे पत्र पाठवा.
- भारतीय नववर्ष दिनाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा.
- दर महिन्याचे पगार १ तारखेला द्या. १ जानेवारी, फेब्रुवारी नव्हे तर १ चैत्र, १ वैशाख इ.
- भारतीय रिझर्व बँक (Master circular DBOD No. Leg BC 21/09-07-006) माध्यमिक शाळा संहिता (GAC-1083/89/SE-2 Dt-16-3-83) यांचे परिपत्रके अमलात आणा.
- आपल्या घरात, ऑफिसात, टेबलवर, खिशात भारतीय सौर दिनदर्शिका ठेवा. रोजच्या व्यवहारात भारतीय सौर दिनांकचा वापर करा.
- भारतीय सौर दिनांक आणि इंग्रजी महिने यांचा थेट संबंध आहे
- मकरसंक्रात १४ जानेवारी २४ पौष
- प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी ६ माघ
- आंबेडकर जयंती १४ एप्रिल २४ चैत्र
- महाराष्ट्र दिन १ मे ११ वैशाख
- स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २४ श्रावण
- गांधी जयंती २ ऑक्टोबर १० आश्विन
- भारत सरकारने दिनांक २२ मार्च १९५७ रोजी राष्ट्रीय कॅलेंडर अधिकृतपणे सुरू केले तो दिवस होता १ चैत्र १८७९. भारतीय सौर दिनांक आपल्याला रोज सांगितला जातो-
- आकाशवाणीवरून
- दूरदर्शनवरून
- दैनिकांमधून
- शासकीय कॅलेंडरमधून
- शासकीय पत्रकांमधून
- डायऱ्यांमधून
- भारतीय कॅलेंडरचा वापर
- गॅझेट ऑफ इंडिया
- भारत सरकार
- रेडीओ सेवा
- वर्तमान पत्र
- दूरदर्शनवरील बातम्यांमध्ये
- आंतरराष्ट्रीय करार करताना
- सागरी सफरी साठी
- राष्ट्रीय मानके
- राष्ट्रीय प्राणी - वाघ
- राष्ट्रीय पक्षी मोर
- राष्ट्रीय झेंडा - तिरंगा
- राष्ट्रीय खेळ- हॉकी
- राष्ट्रीय फूल - कमळ
- राष्ट्रीय कॅलेंडर - सौर कॅलेंडर,
- राष्ट्रीय सण-१५ ऑगस्ट, २६, जाने-
- राष्ट्र गीत - जन-गण-मन
- राष्ट्र गान- वंदे मातरम्
- राष्ट्रीय वृक्ष- वड
- राष्ट्रीय जलचर डॉल्फीन
- राष्ट्रीय फळ आंबा
- राष्ट्रीय नदी गंगा